इकरा एच. जे थीम व इकरा बी एड महाविद्यालया तर्फे आर्टीफिशियाल इंटेलिजेन्स विषया वर कार्यशाळा

इकरा एच. जे थीम व इकरा बी एड महाविद्यालया तर्फे आर्टीफिशियाल इंटेलिजेन्स विषया वर कार्यशाळा
जळगाव प्रतिनिधी, फरहान शेख
जळगाव, इकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम महाविद्यालय व इकरा बी एड कॉलेज जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "आर्टीफिशियल इंटेलिजेन्स" या विषया वर कार्यशाळा, आयोजीत करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार होतें. प्रमुख अतिथी म्हणून श्री इकबाल ऑफिसर, (अध्यक्ष ऑल इंडिया मेमन जमात ). गुल बुटे ( मुंबई) चे संपादक सय्यद फारूक, डॉ इकबाल शाह, एजाज मलिक, अमिन भाई बादली वाला, जफर सर , अब्दुल मजीद सेठ, गणी भाई मेमन, नाबी दादा बागवान, तसेच मेमन जमात चे गण मान्य व्यक्ती उपस्थीत होते. कार्यक्रमा ची सुुवात कुरान पाठणा ने प्रा डॉ अख्तर शाह यांनी केली. सूत्र संचालन प्रा मुजममिल नदवी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत,प्रभारी प्राचार्य डॉ चांद खान, प्रा डॉ इरफान शेख, डॉ शेख वकार, गुलाब शेख, हरून शेख, झुबैर मलिक, जमीर अश्रफ काझी, डॉ. तनवीर खान, डॉ. युसूफ पटेल, डॉ. फिरदौस जमाल यांनी केले. अध्यक्षीय भाषण करताना डॉ अब्दुल करीम सालार यांनी सांगितले की माणसा ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला आपले गुलाम केले पाहिजे. त्याचे गुलाम होता कामा नये, त्या नंतर सय्यद फारूक (गुल बुटे) यांनी आरटीफिसियल इंटेलिजन्स वर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला इकारा एच जे थीम, इकरा बी एड कॉलेज, डी एड कॉलेज , आय टी आय, चे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी, मोठया संख्येने उपसथित होते. उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ इरफान शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments