कारंजा नगरपरिषद अग्निशामक दलाच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला,
50ते 60 लाख नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे,
कारंजा बायपास खान पेट्रोल पंप समोर तीन दुकानांना ला आग लागल्याची घटना दिनांक 27नोव्हेंबर रोजी रात्री 10.10 सुमारास घडली.
प्राप्त माहिती नुसार कारंजा दारव्हा महामार्गावर पेट्रोल पंपा समोर पॉप्युलर मोटर गॅरेज व ताज बॅटरी या दुकानाला आग लागल्याची माहिती शंतनु चौधरी यांनी श्री गुरु मंदिर रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी दिली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती कारंजा नगर परिषद अग्निशामक दलाचे फायरमन शुभम झोपाटे यांना दिली. त्यांनी वरिष्ठाला माहिती देऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी मुख्याधिकारी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे अधिकारी बाथम साहेब यांनी पूर्ण टीम सह अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
अशावेळी कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल नेहमी तत्पर असतात. सदर दुकान खान पेट्रोल पंप समोर असल्यामुळे खूप मोठा धोका निर्माण होऊ शकला असता. पण अशा वेळेस कारंजा नगर परिषद अग्निशामक च्या तत्परतेने आगीवर लवकरच नियंत्रण मिळविले. ताज बॅटरी दुकानाचे अंदाजे नुकसान 30 ते 40 लाख झाल्याची माहिती त्याचे मालक साजिद भाई व पॉपुलर गॅरेज चे मालक मोहसीन भाई यांनी 20 ते 25 लाख नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रश्नांचा सामना फायरमॅन वर त्यांच्या टीमला करावा लागतो. आग लागल्या ठिकाणी झालेली गर्दी पाहता कारंजा शहर पोलीस स्टेशन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते. यावेळी आग विझविताना कार्यरत असलेले *फायर अधिकारी* श्री बाथम साहेब
*चालक* संजय रेवाळे ,भरत जोंधळे ,*फायरमन* शुभम झोपाटे आमद खान, ,इमरान खान,कैलास बारबोले कृष्णा कोकाटे, विकी बारबोले, जायेद अली, यांनी अथक प्रयत्न केले.
0 Comments