जळगावात कादरिया फाउंडेशन चा अभिनव उपक्रम.
आज जळगावात शहर मे कादरिया फाउंडेशन चा अभिनव उपक्रम
समाजिक कार्यात नेहमी सातत्य राखणाऱ्या जळगाव शहरातील कादरिया फाउंडेशन तर्फे या वर्षी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे, समाजातील विधवा,परितक्त्या,अशिक्षित महिला ज्याना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु त्या करीता योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळत नाही आणि व्यावसायिक सल्लागारांची फि परवडत नाही अश्या महिलांसाठी कादरिया फाउंडेशन ने मोफत कायदे विषयक व इतर सल्ला मोफत देण्याचे ठरविले व त्याप्रमाणे एक महीनाभर दि.22 एप्रिल पर्यन्त दर शनिवार,रविवार रोजी हा उपक्रम सुरु असून आता पर्यन्त 300 हुन अधिक महिलांनी याचा लाभ घेतला आहे.
यामधे कौटुंबिक समस्यांसोबतच संजय गांधी निराधार योजना, स्वयं रोजगारासाठी कर्ज योजना,घरकुल प्रकरण ई. महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. काही समस्या या अत्यंत कौटुंबिक असल्याने संबंधितांचे नाव गुप्त ठेवण्याची पुरेपुर काळजी ही घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष येणे शक्य नसलेल्या महिलांना अगदी फोनवर सुद्धा मार्गदर्शन देण्यात येत आहे. आणि नुसतेच मार्गदर्शन करण्यापेक्षा समस्येचे संपूर्ण निराकरण करण्यावर संस्था लक्ष देत आहे.
या अभिनव उपक्रमाची संकल्पना कादरिया फाउंडेशन चे अध्यक्ष मा. फारूक क़ादरी त्यांचे सहकारी शेख अकील शेख अहमद, अहमद खान असलम खान,अताउल्ला खान,जुबेर शेख मो.रफीक यांची असून शिवसेना महिला आघाडी महानगर अध्यक्षा गायत्री विश्वनाथ सोनवणे यांचे सहकार्य लाभत आहे तर कायदेविषयक सल्ला देण्याचे मोलाचे कार्य एड वोकेट दिपाली भावसार, एडवोकेट सलीम आय शेख हे करीत आहेत.
सदर उपक्रम दि.22 एप्रिल पर्यन्त दर शनिवार,रविवार रोजी ईदगाह काम्प्लेक्स,अजिंठा चौफुली जवळ येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे पर्यंत सुरु राहणार असून गरजु महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात येत आहे.
अधिक माहितिसाठी संपर्क:-
फारूक क़ादरी:- फोन 95610 51999
0 Comments