Sach crime news
मुकेश संपादक रशीद शेख. Sach crime news
8484819485 समीर शहा रिपोर्ट
--------------------- -------------------------
कै.इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळेत रमजान ईदचा सोहळा साजरा जळगाव दि.24 एप्रिल 23
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर मधील सर्वात जुन्या आणि नावाजलेल्या कै.इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळेत रमजान ईद निमित्त स्नेह सोहळा अतिशय चैतन्याने साजरा करण्यात आला.
शाळेत सर्व प्रकारचे सण आणि उत्सव साजरे करीत असताना मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण देखील साजरा करण्याची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास तायडे यांनी मांडली आणि शाळेने या संकल्पनेचा स्वीकार करून शाळेत आज रमजान ईद चा स्नेह सोहळा साजरा केला.
या सोहळ्यात शालेय परिसरातील मा. हजरत बिलाल फाउंडेशन के अध्यक्ष अखिल पैलवान , कादरिया फाउंडेशन के अध्यक्ष फारुख कादरी साहेब, प्रा. रफीक सर व आर पी आई जिलाध्यक्ष अजीज मुजावर ह्या मान्यवरांनी ईद सणाचे महत्त्व विशद करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
माता पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून शाळेचा अभिमान वाटत असल्याचे मत मांडले.
केवळ जळगावातच नव्हे तर संपूर्ण भारतात अशा प्रकरचा आदर्श निर्माण करणारी ही एकमेव शाळा असल्याचे गौरवद्गार सर्वांनी या समयी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी ईद ची खासियत असणारा शिरखुर्मा या पदार्थाचा आस्वाद घेतला. सध्या परिसरात सर्वत्र या आगळ्या वेगळ्या सोहळ्याची स्तुतीपर चर्चा होत आहे.
0 Comments