*इकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये तीन दिवसीय एच एस इ टी (MET) कार्यशाळा संपन्न
जलगांव :(शाह एजाज़ गुलाब)
इकरा युनानी मेडिकल कॉलेज मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या निर्देशीत Basic workshop on health Science Education (MET) कार्यशाळेचे आयोजन दिनांक 25/09/2024 ते 27/09/2024 रोजी करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन शासकिय आयुर्वेद कॉलेजचे तसेच एच एस इ टी चे को-ऑर्डिनेटर डॉ. राजेश कोलारकर, इकरा युनानी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख शेख यांच्या हस्ते करण्यात आला. या मध्ये आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांनी तीन दिवसिय कार्यशाळेत सहभाग घेतला. या कार्यशाळे मध्ये डॉ. राजेश कोलारकर, डॉ. राजेश सुरवाडे, जि एम सी, जळगाव, डॉ. शर्मिली सुर्यवंशी, डॉ. योगीता बाविस्कर, डॉ. सुमेध सोनावने, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. विलास मालकर, डॉ. शोएब शेख यांनी गेस्ट लेकचरर म्हणुन Basic workshop on health Science Education या विषयावर उपस्थित प्राध्यापकांचे लेकचर घेतले. या कार्यशाळेचे आयोजन इकरा युनानी कडून करण्यात आले. दिनांक 27/09/2024 रोजी दुपारी कार्यशाळेचे समापन करण्यात आले.
या कर्यशाळेत डॉ. मुजफ्फर शेख, युनानी विभाचे बि ओ एस चैरमन यांना इकरा युनानी मेडीकल कॉलेज कडून “निशाने इकरा” मोमेंटो देऊन संमानित करण्यात आला. तसेच कार्यशाळेचे को-ऑर्डिनेटर डॉ. राजेश कोलारकर यांना सुद्धा “निशाने इकरा” मोमेंटो देऊन संमानित करण्यात आले. इकरा इकरा युनानी मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अब्दुल कुद्दुस व डॉ. शोएब शेख यांनी आलेले सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व फॅकल्टी गेस्ट लेकचरर यांचे आभार मनले. व आपण या तीन दिवसिय कार्यशाळात सहभाग घेतला त्या बद्द्ल त्यांचे अभिनंदन केले.
0 Comments