कारंजा दारव्हा रोडवरील मंगरूळ वेळ जवळील घटना।
कारंजा प्रतिनिधि.रमेश देशमुख
प्राप्त माहितीनुसार दिनांक 5 /9/ 2024 रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान दुचाकी क्रमांक MH37 Z 8564 व MH37 R 2295 समोर समोरासमोर होऊन दोन दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती तात्काळ अंकुश( गोलू ) झोपाटे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. यांनी तात्काळ अपघाताची माहिती श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य स्वामी महाराज रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक नितीन पाटील मानकर यांना दिली.
त्यांनी तात्काळ घटनास्थळीत जाऊन जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. जखमी चे नावे. गणेश आंबेकर वय 30 रा. मोऱ्हळ
अलीम खान 33 रा. समता नगर कारंजा अशी आहेत. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले आहे.
0 Comments