ईद -ए -मिलाद ची सुटी 16 ऐवजी 18 ला घोषित करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी
जलगांव :(शाह एजाज़ गुलाब)
ईद -ए -मिलाद ची सुटी 16 ऐवजी 18 ला घोषित करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी
मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र महत्वपूर्ण सण ईद ए मिलाद हे 16 सप्टेंबर 2024सोमवारी असून त्याच वेळेला हिंदू बांधवांचा गणेश उत्सव असल्यामुळे हिंदू बांधव तसेच प्रशासनाला व सरकारला कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी एकमताने ईद मिलाद हा सण दि 16 सप्टेंबर सोमवार ऐवजी दि. 18 सप्टेंबर 2024बुधवारी जुलूस काढून साजरा करण्याचे ठरविण्यात आलेले आहे. या दिवशी मुस्लिम बांधवांकडे भरपूर कार्यक्रम आयोजित केले जातात.
म्हणून ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी ही दि 16 सप्टेंबर सोमवार ऐवजी दि. 18 सप्टेंबर बुधवारी घोषित करण्यात येऊन लवकरात लवकर तसा जीआर महाराष्ट्र सरकारकडून काढण्यात यावा जेणेकरून मुस्लिम बांधवांना त्याचा फायदा होईल यासाठी आज महामहीम मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मा जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्याद्वारे निवेदन पाठवून त्यात ही मागणी करण्यात आलेली आहे.
यावेळी शिष्टमंडळात सुन्नी जामा मस्जिद जळगाव, सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व जुलुसे ईद मिलाद कमिटी जळगाव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, आसिफ शाह बापू, सय्यद इरफान, जावेद गौस मोहम्मद, रईस चांद, अरमान बिलाल, शेख रफीक शफी ठेकेदार, शेख नूर मोहम्मद इत्यादी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मी आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवतो निवेदनाद्वारे असे सांगितले.
0 Comments