केके उर्दू गर्ल्स हाई स्कूल व कॉलेज मधे गांधी आणि शास्त्री जयंती साजरी

के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये गांधी व शास्त्री जयंती साजरी. 

जळगाव : (शाह एजाज़ गुलाब) येथील अंजुमने खिदमते खल्क संचालित के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांची जयंती मुख्याध्यापिका तन्वीर जहाँ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक ज़ाकिर शाह यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली या वेळी ज़ाकिर शाह  ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना  मार्गदर्शन करताना सांगितले की महात्मा गांधीं आपले जीवन सत्य, अहिंसा व देश सेवे साठी समर्पीत केलं. तर थोर स्वातंत्र्य सेनानी  देशा चे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या बद्दल  माहिती देतांना त्यांचे जय जवान जय किसान व  साधी राहनी उच्च विचारसरणी जिवन शैली
 बद्दल माहिती दिली  मुश्ताक भिस्ती  यांनी शास्त्री जीणींच्या राष्ट्रीय निती व जिवन परिचय  देशाच्या प्रगती,उन्नतीसाठी केलेल्या विशेष कामगिरी ची माहिती दिली , लईक शाह नी महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सत्याग्रह बद्दल माहिती देवून स्वातंत्र्य  चळवळीतील कार्य सांगितले  विद्यार्थिनी मसीरा वसीम मलिक व  नमीरा हफिज़ खान यांनी ही महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या सामाजिक , राजकीय  व राष्ट्रीय कार्या बद्दल  विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख शेख मज़हरोद्दीन , तबरेज शेख व रिजवाना सय्यद यांनी परिश्रम घेतले  सूत्रसंचालन तबरेज़ शेख यांनी तर आभार मुश्ताक भिस्ती यांनी व्यक्त केले

Post a Comment

0 Comments