नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा चे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे व विश्वासराव आरोटे प्रदेश महासचिव यांच्या अध्यक्षखाली असंख्य पत्रकारांच्या उपस्थितीत संवाद यात्रेला हिरवी झंडी

नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा चे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे व विश्वासराव आरोटे प्रदेश महासचिव यांच्या अध्यक्षखाली असंख्य पत्रकारांच्या उपस्थितीत संवाद यात्रेला हिरवी झंडी 

प्रतिनिधी. गणेश सुरजूसे

नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रा आज दिनांक 28 /7 /2024 रविवार रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे संवाद यात्रेची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांचे अध्यक्ष खाली नागपूर दीक्षाभूमी येथील पावन भूमीचे मानवंदना करून तथा दर्शन घेऊन पुष्प अर्पण करून संवाद यात्रेचे मोठ्या थाटात उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली 
या ऐतिहासिक संवाद यात्रेमध्ये असंख्य राज्यभरातून पत्रकार बांधव व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस पत्रकारांच्या मागण्या व समस्या या संदर्भात सरकार सोबत प्रमुख मागण्याबाबत चर्चा करून मागण्या पूर्ण करण्यासाठी ही संवाद यात्रा पत्रकारांच्या हितासाठी नागपूर दीक्षाभूमी येथून महाराष्ट्रभरातील जिल्हा जिल्ह्या मध्ये पत्रकारांसोबत संवाद साधून मंत्रालय मुंबई येथे दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी पोहोचणार आहे त्याकरिता महाराष्ट्रभरातून पत्रकारांनी आपल्या जिल्हा जिल्ह्यामध्ये संवाद यात्रेचे मोठ्या संख्येने पत्रकारांना सहभागी होण्याचे तथा सर्व पत्रकार संघटनांनी यामध्ये पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तथा उपस्थित राहण्याचे असे आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी बोलताना सांगितले व प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांनी सुद्धा सरकारने जनसामान्य व शेतकरी तथा इतरांसाठी अनेक योजना चे शुभारंभ करून त्यांना प्रोत्साहन देत आहे मग पत्रकारांना का नाही असे आपल्या भाषणामध्ये बोलत होते यावेळेस दीक्षाभूमी येथे मोठ्या संख्येने पत्रकार बांधव संवाद यात्रा यामध्ये सहभागी झाले असल्याचे विदर्भ अध्यक्ष यांनी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तथा जिल्हा जिल्ह्यामध्ये संवाद यात्रेचे पत्रकारांनी आदरपूर्व सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे नुकते साक्षीदार न होता भागीदार व्हावे अशी विनंती केली.
           जाहिरात व बातमी साठी संपर्क करा

Post a Comment

0 Comments