ऐंटी करप्शन मानव अधिकार सेवा च्या वती ने गौतम बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रम

अँटी करप्शन मानव अधिकार सर्वशक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने  तथागत भगवान गौतम बुद्ध  जयंती (बुद्ध  पौर्णिमा) विविध कार्यक्रम संपन्न .  
जलगांव :(शाह एजाज़ गुलाब)
  साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध  यांच्या जयंती निमित्त अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ  इंडियामानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन  सर्व शक्ती सेना महाराष्ट्र  राज्याच्या वतीने विविध कार्यक्रर्माचे  आयोजन करण्यात आले होते.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  अँटी करप्शन  मानव अधिकार शक्तीसेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे हे होते.  तर  प्रमुख अतिथी म्हणुन सौ. मायाताई मोरे सर्व  शक्ति सेना महाराष्ट्र राज्य सल्लागार डॉ. महेंद्र सुरवाडे, डॉ. संदीप गाढे प्रा. सुनील तायडे हे होते. सकाळी बुद्धविहारात जाऊन  तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला  पुष्पहार  मेणबती लाऊन त्रिशरण  पंचशील अष्टगाथा ग्रहण करूनभन्ते सुगवंत महाथेरो (श्रीलंका) यांना स्वप्निक पुष्पहार व दान देऊन  वंदन केले. मुर्तीला अभिवादन करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यावरून पंचशील ध्वज लावुन मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात खिरदान वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी प्रा. संजय मोरे यांनी बुद्धविहारात आपले मनोगत व्यक्त करतांना  सांगितले कि, सिद्धार्थ गौतम, भगवान बुद्ध यांचा जन्म इ. स. पुर्व 563 वैशाखं पौर्णिमे च्या दिवशी लूंबीनी ( नेपाळ) येथे झाला.त्याच्या  वडिलांचे नांव  शुद्धीधन तर आईचे नांव  मायादेवी असे होते.संपुर्ण जगामध्ये ओळखल्या जाणाऱ्या बोध्दगया ( "ज्ञानस्थान" )  म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बसून ध्यान केले.वयाच्या 35 व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली.  त्याच्या   शोधचा   कळस गौतम बुद्ध पिपंळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना जिथे त्यांना शेवटी दुःखा पासुन मुक्त कसे व्हायचे आणि शेवटी मोक्ष कसा मिळवायचा हे समजले. या एपिफेनी नंतर, गौतम बुद्ध म्हणुन ओळखले गेले. याचा अर्थ " प्रबुद्ध "असा होतो.बुध्दांना  अलारा कलामा एक सांख्य तत्वज्ञानी यांनी ध्यांन करायला शिकविले. ते गौतम बुद्धाचे पहिले शिक्षक गुरु होते. भारतातील कोट्यावधी  दलित व हिंदू धार्मियांनी आणि जगभरातील अनेक  मानवतावादी  विज्ञानवादी लोकांनी गौतम बुध्दांचे अनुयायित्व  स्विकारले असुन  सर्व हिंदु अनुयायाची लोकसंख्या ही 2.3 अब्जजावर आहे.बौद्ध अनुयायी लोक  शाख्यमुनी  गौतम  बुद्धाना वर्तमानातील  सर्वश्रेष्ठ  बुद्ध म्हणजेच  ' संमासंबुद्ध '  मानतात. जगाच्या इतिहासातील  महामानवा मध्ये  तथागत  गौतम बुद्ध हे सर्व श्रेष्ठ मानले जातात. बुद्धाच्या धम्माला [ पंथाला वा तत्वज्ञानाला ]    'बौद्धपंथ ' किंवा 'बुद्धिझम ' म्हणतात.तथागत बुद्धाचा अनुयायात दोन भाग पडतात. सिद्धार्थ गौतमाला  बुद्ध का म्हणतात..... गौतम बुद्धाना ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. असे म्हणतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लबिनी मध्ये भगवान बुद्धाचा जन्म झाला होता.आणि त्यांना बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर ते तथागत गौतम बुद्ध म्हणुन ओळखले जाऊ लागले. असे प्रा संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.या कार्यक्रमाला मायाताई मोरे सयाबाई सुरवाडे डॉ. महेंद्र सुरवाडे डॉ.  संदिप गाढे प्रा. सुनील तायडे चंद्रमनी  सोनवणे बाळा शिरतुरे  प्रदीप पानपाटील आर. डी.पाटील सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी प्रा. योगीता सपकाळे  शोभा कोळी  श्रीरंग सुरवाडे रंजना सपकाळे युवराज कोळी विकास सपकाळे  सचिन सुरवाडे चिमुकले अर्णव सुरवाडे सुशांत सुरवाडे या सह असंख्य उपासक उपासीका  उपस्थित होते.
खबरों तथा विज्ञापनके लिए संपर्क करे
रशीद शेख मुख्य संपादक 8484819485
शाह एजाज़ 7385612886

Post a Comment

0 Comments