लोकसभा निवडणूक मतदान जन जागृती करीता आइकॉन मुकुंद गोसावी यांचा जिला प्रशासन तर्फे सत्कार व स्नमान

लोकसभा निवडणूक २०२४, मतदान जनजागृती करिता आयकॉन मुकुंद गोसावी यांचा जिल्हा प्रशासनतर्फे सन्मान

जळगाव :(एजाज़ गुलाब शाह)

लोकसभा निवडणूक २०२४ मतदान जनजागृती कार्यात  आपल्या शारीरिक त्रासाला न जुमानता उल्लेखनीय सेवा,जनजागृती कार्य केल्याबद्दल  जिल्हा आयकॉन मुकुंद गोसावी यांचा प्रशासनातर्फे विशेष मानपत्र देऊन सामाजिक न्याय भवन येथे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.
     या प्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान व मतदानाच्या कार्यात नियमित स्वयंभू सहभाग घेत असल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (IAS) यांनी मुकुंद गोसावी यांचे कौतुक केले. जिप.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित जी (IAS), रेडक्रॉस रक्त केंद्राचे चेअरमन डॉ.प्रसन्न रेदासणी, रेडक्रॉस चे उपाध्यक्ष गनी मेमन,होंडा शोरुमचे किरण बछाव ,दीव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी.गणेशकर यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते

खबरो तथा विज्ञापन के लिए संपर्क करे
मुख्य संपादक रशीद शेख 8484819485
शाह एजाज़ 7385612883

Post a Comment

0 Comments