जे.सी.आय वह मुक्ति फाउंडेशन कडून मतदान जनजागृती

*जे.सी.आय व मुक्ती फाउंडेशन तर्फे मतदान जनजागृती*            
 *आयकॉन मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फुर्त मतदानाचे आवाहन* 

जळगाव :(शाह एजाज़ गुलाब)

गेल्या अनेक दिवसांपासून मतदारांना मतदानाचे आवाहन करत आपल्या दिव्यांग मोटरसायकल द्वारा शहरात विशेष जनजागृती करणारे जिल्हा आयकॉन मुकुंद गोसावी यांनी आपल्या सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन व जेसीआय संस्थेच्या वतीने जनजागृती पर कार्यक्रम नुकताच घेतला याप्रसंगी घरोघरी व जिथे आम्ही राहतो त्याआपल्या परिसरात जाऊन निश्चितच निर्भीडपणे मतदान करण्याकरिता आपल्या सोबत कार्य करू तसेच याप्रसंगी आयकॉन मुकुंद गोसावी यांच्या समवेत सुदृढ  राष्ट्राकरिता मतदान करण्या करिता  प्रतिज्ञा  सी.ए. विद्यार्थी संघटना जळगाव अध्यक्ष सीए.हितेश आगीवाल,वेणुगोपाल बिर्ला अध्यक्ष जेसीआय, हेमंत आगीवाल, सचिव, पारस झंवर, कोषाध्यक्ष, ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल संस्था,पियूष शर्मा,अभिलाष राठी, ऋषभ शहा यांनी घेतली.
       देशातील लोकसभेच्या चौथ्या चरणात आपल्या जळगाव व रावेर लोकसभे करिता मतदान आज 13 मे असून नागरिकांनी निर्भीडपणे पूर्णतः मतदान करण्याचा प्रयत्न करावा ,आमच्या शारीरिक व्याधी असलेल्या दिव्यांगांकडे पाहून सुदृढ समाजाने मतदानाच्या कार्यात स्वयंभू सहभाग घ्यावा व मतदार राजा म्हणून आपला मतदानाचा हक्क निश्चितपणे बजाविला पाहिजे असे आवाहन जिल्हा आयकॉन मुकुंद गोसावी यांनी केले आहे.
खबरों तथा विज्ञापन के संपर्क करे
रशीद शेख 8484819485
एजाज़ शाह 7385612883

Post a Comment

0 Comments