अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे छ.शिवाजी नगर परिसातील गरीब गरजू १०५ परिवाराना"शिरखुर्मा" कीट वाटप
जळगाव :(शाह एजाज़ गुलाब) जग भरात मुस्लिम बांधवचा पवित्र रमजान महिना नुकताच समाप्त होऊन रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली असून, रमजान महिन्यात मुस्लिम समुदायाचे लोग पूर्ण महिना रोजा करतात या काळात मुस्लिम बांधव सकाळी सूर्या उद्या पूर्वी रोजा सुरू करतात आणि सूर्य अस्थ झाल्यावर रोजा पूर्ण करतात, या दरम्यान ते अन्न आणि पाणी पूर्ण पाने त्याग करतात,
या जगात लाखो लोक असे आहेत ज्यांना दो वेळचे जेवण पोट भर भेटत नाहि, आणि अनेक गावांत पाणी टंचाई आहे, त्या मुळे त्या ठिकाणी लोक ताणलेले आहेत, इस्लाम धर्मातील रोजा (उपास) याचे उद्देश असेच आहे की भूक आणि तहानचे महत्त्व समजून घेऊन समाज बांधवांनी गरीब, गरजू, भुकेले, ताणलेले लोकांची आठवण करून त्यांची मदत करावी हेच रमजानचा रोजचे उद्देश आहेत..,
या सर्व बाबी ना लक्षात ठेऊन अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दर वर्षी रमजान महिन्यात जकाती (दान) च्या पैशातून गरीब परीवराना "शिरखुरमा" साहित्याचे वाटप करण्यात येते, या वर्षी हि १०५ गरीब परिवाराना शिरखूर्मा साहित्याचे वाटप करण्यात आले यात काजू,बदाम, मनुका, खारीक, खोबरे, साखर, सेवाई इत्यादी पदार्थनाचा समावेश होता.,
या कार्य करीता अल-खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष युसूफ शाह, अ.हमीद जनाब, अ.अजीज सलार, मुंबई येथील इंजी. शोहेब हिंगोला, इंजि. हबीब शेख साहेब, मुसा काकर, सय्यद युसूफ, मतीन शाह, आसिफ शेख, शोएब खाटीक यांनी अर्थ सहाय्य केले आणि आईशा मासालाचे हाजी शाकीर खाटीक यांनी सुखा मेवा दिला, आणि युसूफ शाह, जावेद शेख, जोयेब खाटीक, भैय्या पटेल, समीर शेख यांनी "शीरखुर्मा कीड" गर्जवंताचा घरोघरी पोहचवण्यात मद्दत केली...
तसेच अल खैर मायनॉरिटी चॅरिटेबल ट्रस्ट चा सर्व पदाधिकारी यांनी इस्लाईल देश कडून फिलिस्तीन मध्ये होत असलेल्या अत्याचार चे निषेध करत या वर्षी ईद जुने कपडे परिधान करून साजरी केली या वेळी आपल्या देशाचा तिरंगा ध्वजा बरोबर फिलिस्तीनी ध्वज हि हातात घेण्यात आले होते
0 Comments