एम,आय,डी, सी पोलिस ने आरोपी कडुन चोरीच्या 04 मोटार सायकली केली जप्त,
फिर्यादी नामे सिध्दार्थ सुशिलकुमार लुल्ला रा सिंधी कॉलनी जळगाव यांची दिनांक 25/10/2023 रोजी दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी होंडा कंपनीची फॅशन प्रो ग्रे ब्लॅक रंगाची मो.सा. क्र. MH-19 BP - 1133 मो सा ही सेंट टेरेसा हायस्कुल चे मागुन मेहरुण तलाव परीसर येथुन चोरी गेली होती. फिर्यादी चे फिर्याद वरुन मो सा चोरीबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल आहे.
मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपणीय बातमी मिळाली कि, पोस्टे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडीत साबळे रा सुप्रीम कॉलनी हा चोरीच्या मोटार सायकल घेवुन फिरत आहे अशा बातमीच्या आधारे तो राहत असलेल्या परीसरात दोन टिम तयार करुन त्याच्या मागावर ठेवुन त्यास तो एका मो सा वर जात असतांना त्याचा पाठलाग करुन त्यास पकडुन त्याचे जवळ असलेल्या सी बी शाईन मो सा क्र. एमएच 39 आर 4756 मो सा चे कागदपत्रांबाबत विचारपुस करता त्याने सदर मो सा ही नंदुरबार येथुन चोरुन आणली असल्याचे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेवुन अजुन विचारपुस करता त्याने अजुन 03 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास दि. 01/12/2023 रोजी अटक करुन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दिनांक 05/12/2023 पावेतो 04 दिवस पो.क. रीमांड दिला.
पोलीस कस्टडी रीमांड दरम्यान त्याचेकडुन खालील प्रमाणे मो सा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
1) 30,000/- रुपये किंमतीची होंडा कंपनीची फॅशन प्रो ग्रे ब्लॅक रंगाची मो.सा. क्रम. MH-BP-1132) 50,000/- रुपये किंमतीची सी बी शाईन मो सा क्र. एमएच 39 आर 47563) 45000/- रुपये किंमतीची चॉकलेटी रंगाची होंडा अक्टीवा क्र एम एच 12 क्यु एक्स 67104)20,000/- रुपये किंमतीची होंडा कंपनीची शाईन मो सा क्र. एम. एच 19 सीजी 6978 अशी अंदाजे किम्मत 145000/-₹
सदर आरोपीकडुन वर प्रमाणे 04 मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या असुन त्यापैकि 02 मोटार सायकली बाबत एमआयडीसी पोस्टे, 02जिल्हापेठ पोस्टे, 01 नंदुरबार पोस्टे 01 असे वेगवेगळे 04 गुन्हे दाखल आहेत.सदर कारवाई ही मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, सफौ. अतुल वंजारी, पोहेका अल्ताफ पठाण, पोहका, गणेश शिरसाळे, पोना. किशोर पाटील, पोना, योगेश बारी, सचीन पाटील, विकास सांतदीवे, पोका, छगन तायडे, ललीत नारखेडे यांनी केली आहे.
0 Comments