करिअरचे पार्सलमधून मोबाईल चोरी; नाबालिग ताब्यात

जळगाव: (प्रतिनिधी) जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीत कुरिअर पार्सलमधून मोबाईल चोरी करणाऱ्या प्रकरणाचा पोलीसांनी यशस्वी उलगडा केला असून एका नाबालिग आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 आरोपीकडून विविध कंपन्यांचे एकूण ४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹९६,९९६ इतकी आहे.

 पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाशवाणी चौक परिसरातील एका ट्रान्सपोर्ट कार्यालयाबाहेर ठेवलेल्या कुरिअर बॉक्समधून मोबाईल फोन चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती.

 या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 तपासादरम्यान पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे एका नाबालिगाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली.

त्याच्याकडून खालील मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत:

  • VIVO Y200 – ₹२२,९९९
  • OPPO F21 Pro – ₹२२,९९९
  • OPPO A5 – ₹२१,९९९
  • OPPO A5 – ₹३१,९९९

या सर्व मोबाईलची एकूण किंमत ₹९६,९९६ इतकी आहे.

पोलीसांनी जप्त माल सुरक्षित केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Post a Comment

0 Comments