कलावंत देवानंद गहिले यांना जीवन गौरव पुरस्कार

कलावंत देवानंद गहिले यांना जीवन गौरव पुरस्कार 

अकोला प्रतिनिधि,,,,,

अकोला येथील स्वर्गीय किसनराव सोनोणे सभागृहात 19 जानेवारी 2025 रोजी आयोजित एका भव्य समारंभात ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत, कवी, पत्रकार देवानंद गहिले यांना "जीवन गौरव पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्काराने त्यांना साहित्य, कलाक्षेत्र, संगीत क्षेत्र, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देवानंद गहिले यांना पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला गेला. कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर मान्यवरांनी देवानंद गहिले यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगितली
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावर डॉ. बाबुराव शेळके अध्यक्ष कुणबी समाज विकास मंडळ होते. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये संजय बागलकर, किशोर ठाकरे, डॉ. राजेश्वर शेळके, प्रा. शरदचंद्र ठाकरे, नंदकिशोर शेळके, डॉ. अभय पाटील, डॉ. प्रकाश गोंड, श्रीधर मोरे, ज्ञानेश्वर भगत, राजेश गावंडे, नरेंद्र जकाते, भास्करराव पुराडे, गणेश खुमकर, विलास खुमकर,डॉ. काशिनाथ पाटेकर, अभिराज खडके, अजय वाघ, विनोद मोरखडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या समारंभाचे प्रास्ताविक व संचालन कु. प्रतीक्षा भांबुरकर यांनी केले. त्यांच्या कुशल संचालनामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
देवानंद गहिले यांचे कार्य आपल्या कलेतील गोडवा आणि गहनता दाखवते. साहित्यिक, कवी आणि पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्षे समाजाची सेवा आणि प्रेरणा निर्माण केली आहे. त्यांचे योगदान केवळ कलेपर्यंत मर्यादित नाही, तर त्यांनी समाजाच्या विविध समस्यांवर कलात्मक आणि सृजनशील दृष्टिकोनातून कार्य केले आहेत.
यावेळी अकोला जिल्ह्यात देवानंद गहिले यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात आले आहे।

Post a Comment

0 Comments