मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघात रवी राठीना जनतेचा मोठा प्रतिसाद, स्थानिक उमेदवार असल्यामुळे रवि राठी चर्चेत.

मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघात रवी राठीना जनतेचा मोठा प्रतिसाद।
स्थानिक उमेदवार असल्यामुळे रवि राठी चर्चेत.
मुर्तिज़ापुर प्रतिनिधि,,,,
महाराष्ट्रा मध्ये आगामी विधानसभा निवडणूक पाहता मुर्तीजापुर मतदारसंघात अनेक पक्षांनी या मतदारसंघावर दावे केले आहे मात्र मुळातच राष्ट्रवादीचा मतदारसंघ असलेला मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघात यावेळेस सुद्धा  राष्ट्रवादी लाच सुटणार असल्यामुळे अनेक उमेदवारांनी आपली पसंती राष्ट्रवादी पक्षा कडे दाखवली आहे व उमेदवारी सुद्धा मागितली आहे 
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुर्तीजापुर मतदार संघ हा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाला 100%  सुटणार आहे.
 यामध्ये अनेक उमेदवारांनी उमेदवारी मिळण्या करिता पक्षाच्या प्रमुखा पासून ते स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटण्या करिता व आपल्या बाजूने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उभे राहण्या करिता आपली ताकद पणाला लावली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला उमेदवारी मागणाऱ्यान मध्ये जिल्हा परिषद सदस्य सम्राट भाऊ डोंगरदिवे , आनंद उर्फ पिंटू वानखडे, प्रा. कांबळे, ऍड शेखर वाकोडे, गोपालराव कठाडे, शामराव वाहूरवाघ यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारी मिळन्या साठी आग्रह धरला आहे व त्यांनी सुद्धा आता मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मागील पंचवार्षिकचे पराभूत उमेदवार रा. कॉ प्रदेश संघटन सचिव रवी राठी हे सुरवाती पासूनच प्रचारात अग्रेसर झाले असून यांनी गाव भेटी कॉर्नर सभा याकडे लक्ष केंद्रित केले आहे असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी हे गेल्या अनेक वर्षा पासून आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाच्या मेळाव्याच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्त्यांन च्या संपर्कात सतत राहून मोठ्या प्रमाणात मतदारसंघात सक्रिय झाले असून सध्या स्थितीत सामान्य जनतेच्या मनात व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात रवी राठी यांना रा. कॉ पक्षाची उमेदवारी मिळणारच अशी संपूर्ण मतदार संघा मध्ये चर्चा सुरु आहे. तसेच स्थानिक उमेदवार असलेले रवी राठी यांनी मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणूकी मध्ये 42000 हजार मतदान घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते त्यावेळेस सुद्धा त्यांचा पक्ष पातळीवर मोठा जनसंपर्क असल्यामुळे व पदाधिकारी कार्यकर्ते व सामान्य नागरिकांच्या मोठ्या प्रमाणत जनसंपर्क असल्यामुळे त्यांनाच शरदचंद्र पवार गटातर्फे उमेदवारी मिळण्याची चर्चा सध्या संपूर्ण मूर्तिजापूर मतदार संघात रंगू लागली आहे यावेळेस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवी राठी हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाचे उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा संपूर्ण विधानसभा मतदार संघा मध्ये सुरु आहे !
तसेच 2 महिन्या अगोदर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी हे महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक झाले होते व डॉ अभय पाटील यांच्या करिता त्यांनी मूर्तीजापुर  मतदार संघात संपूर्ण पिंजून काढला होता व  महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्यासाठी प्रचार केला होता त्यावेळेस विधानसभे च्या उमेदवारी मागणाऱ्यान पैकी फक्त रवी राठी हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकमेव पदाधिकारी होते ज्यांनी डॉक्टर अभय पाटील यांच्यासाठी रात्र दिवस एक करून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार केला होता याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष प्रमुख घेतील व रवी राठी यांनाच उमेदवारी देतील अशी चर्चा मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघा मध्ये सुरु आहे।
.        जाहिरात व बातमी साठी संपर्क करा.   

Post a Comment

0 Comments