के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये "चिंतन दिवस" उत्साहात साजरा.
जळगाव:(शाह एजाज़ गुलाब)
येथील अंजुमने खिदमते खल्क संचलित के .के. उर्दू गर्ल्स हाई स्कूल व डॉ. शाहीन काज़ी ज्युनियर कॉलेज मध्ये दिनांक 22 फेब्रुवारी २०२४ स्काऊट गाईड विभागा तर्फे जनक लार्ड बेडन पाॅवेल लेडी हेडन पाॅवेल यांचे जन्मदिवस चिंतन दिवस" म्हणून साजरा करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका तन्वीर जहाँ शेख होत्या आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांनीना लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या कार्य विषयी माहिती देत स्काऊट गाईड चे नियम वचन ध्येय यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करून आपण निरोगी जीवन कसे जगू शकतो या संदर्भात मार्गदर्शन करुन चिंतन व नमन करून जीवन कसे सफल बनवु शकतात या विषयी सखोल माहिती दिली. शिक्षिका शकीला शेख, सैय्यद रिजवाना यांनी विद्यार्थिनींना व्यायामाचे प्रकार व धडे शिकविले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमीला खान, शेख समीना व नाज़िया शेख यांनी परिश्रम घेतले. आभार नसरीन कादरी यांनी व्यक्त केले.
रशीद बागवान 8484819485
एजाज़ शाह 7385612883
0 Comments