मित्रानेच केला मित्राचा घात चाकूचा धाक दाखवून चोरी एमआयडीसी पोलिसांनी केले गुन्ह्याचे उघड

मित्रानेच केला मित्राचा घात चाकूचा धाक दाखवून चोरी एमआयडीसी पोलिसांनी केले गुन्ह्याचे उघड




दिनांक 28/03/2023 रोजी रात्री 09.00 वाचे सुमारास अभिषेक जगन्नाथ निंभोरे वय 24 वर्ष धंदा शिक्षण रा. प्लॉट नं. 43 गट नं. 151/1, किसनराव नगर जळगाव ता. जि. जळगाव हा व त्याचा मित्र साहिल विजय कासार वय 23 रा. सिंधी कॉलनी नेत्र ज्योती हॉस्पीटल जवळ जळगाव असे ऍक्टीव्हा मो.सा. ने रायसोनी इंजीनिअरींग कॉलेज कडुन जळगाव कडेस येत असतांना कृष्णा लॉन्स मेहरुण तलावाजवळ रस्त्यावर उभे असलेल्या दोन तरुणानी त्यांना अडवुन चाकुचा धाक दाखवुन 15,000/- रूपये किमतीचा वन प्लस किमतीचा मोबाईल व चांदीची चैन असे बळजबरीने हिसकावुन घेवुन गेले होते. सदर बाबतीत अभिषेक जगन्नाथ निंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोस्टेला दिनांक 29/03/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.



सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत सो. यांनी भेट दिली होती सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या सदर गुन्हयाच्या तपास सुरु असतांना पोलीस निरिक्षक श्री जयपाल हिरे सो. यांना माहिती मिळाली की सदर गुन्हयातील फिर्यादी अभीषेक जगन्नाथ निंभोरे याचा मित्र साहिल विजय कासार याने त्याच्या ईतर दोन साथीदारांचे मदतीने सदरचा गुन्हा केला आहे. बाबतची माहिती मिळाल्याने लागलीच एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने साहिल विजय कासार यास ताब्यात घेतले होते व त्यांचे सोबत गुन्हा करतेवेळी असलेले त्याचे साथीदार भोला अजय सरपटे वय 22 रा. नवल कॉलनी नेत्र ज्योती हॉस्पीटल जवळ जळगाव, आतिष नरेश भाट वय 23 रा. सिंगापुर कंजरवाडा जळगाव यांना ताब्यात घेतले होते त्यांनी सदरचा गुन्हा कबुल करुन साहिल याने तो व त्याचा मित्र अमीषेक असे सदर ठिकाणाहून जाताना लुटमार करा असे सांगितल्यांने सदरचा गुन्हा केल्या बाबत सांगितले होते. सदर आरोपीना गुन्हयाकामी अटक करण्यात आली असुन सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासात उघडकीस आला असुन सदरची कारवाई मा. पोलीस निरिक्षक जयपाल हिरे सो. याच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्री रविंद्र गिरासे, सफौ अतुल वंजारी, पोना / सुधीर साळवे, पोना / ईम्रान सैय्यद, पोकॉ/ छगन तायडे, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंढे अशांनी केली असुन आरोपीना आज रोजी न्यायमुती श्रीमती कुलकर्णी मॅडम यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिवसाची एक एप्रिल पाव येतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे सरकार तर्फे अॅड / स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.

Post a Comment

0 Comments