उदयनगर प्रतिनिधि, रफिक खान
उदयनगर येथे 23 सप्टेंबर रात्री साडेदहाच्या सुमारास एका चार चाकी कार पकडुन सहालाख चाळीस हजार रुपया चा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मुद्दे माल जप्त केला आहे.
अमडापूर पोलिसांना मिळालेल्या गुपित माहिती एक इसम शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्रीसाठी घेऊन जात आहे अमडापूर पोलिसांनी सापळा रचून उदयनगर येथे हरणी फाट्यावर शहाजीराजे विद्यालय समोर संशयित गाडी एम एच 28 बिग क्यू रेनाॉल्ड ट्रायबर चारचाकी वाहन थांबवुन पंचा समक्ष तपासणी केली असता त्यात राजनिवास सुगंधीत पान मसाला चे 200 पाकीट त्यासोबत वापरण्यात आलेले तंबाखूचे 200 पाकीट प्रत्येकी किम्मत अंदाजे 200रुपये प्रमाणे ऐकुन 40000रुपये व चारचाकी वाहन 6 00000 रुपये असा 6,40000चा मुद्दे माल जप्त करण्यात आला. राजु उर्फ अविनाश केशवराव माकडे रा.सावजी गल्ली गांधी नगर चिखली गाडी चालक मालका विरूद्ध कलमअन्वये263/2024,223,275,123 भारतीये ण्याये संहिता सहकलम अन्न सुरक्षा कायदा कलम 2006 चे कलम26,2,चे शिक्षापात्र कलम59असे गुन्हे दाखल केले असुन आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाचा पि सी आर मंजूर करण्यात आला आहे.
सदर कार्यवाई स.पो.नि निखील निर्मळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भगवान शेवाळे अमोल काकडे पोलीस स्टेशन अमडापुर यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.उपनिरीक्षक युवराज राठोड हे करीत आहेत.
0 Comments