पवन जैन यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सेवामुर्ती पवनभाऊ जैन
 यांना 4 डिसेंबर मंगलमय जन्मदिनाच्या आनंद, सुखमय जीवना करिता मनापासून
 हार्दिक शुभकामना..
जलगांव : (शाह एजाज़ गुलाब)
सदैव सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,  कला,क्रीडा,विशेषत आरोग्य सेवेत तन्मयतेने कार्य करणारे रुग्णसेवेसाठी  आपल्या विल्सन फार्मा व उपहार फाउंडेशन तर्फे अखंड सेवारत सेवाभावी व्यक्तिमत्व असलेले पवन भाऊ यांच्यावर काळाने मोठा प्रहार करीत आई-वडिलांचे दुर्देवाने बालपणीच कृपा छत्र हिराऊन घेतले असतांना त्यांना मायेची ममता देणारे आदरणीय लखीचंदजी यांच्या स्नेह, संस्कार लाभला. दुःख विसरत स्वत: शालेय, महाविद्यालययीन शिक्षण पूर्ण करीत जिद्द परिश्रम चिकाटी या त्रिसूत्रीवर उभे ठाकत त्यांनी
 प्रगतीची आस धरली ती आजतगायत प्रगती,उन्नतीचा चढता आलेख गाठत पवनभाऊ आज यशदायी युवा उद्योजक आयकॉन म्हणून नावारूपाला आले असून, त्यांचा बहुविध विख्यात नामांकित संस्था, मीडिया द्वारे सन्मान गौरवही झालेला आहे पीडित,उपेक्षित वंचित यांना कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न करता पवनभाऊ यांचामायेचा आधार असतो आणि नेहमी राहील,वंदनीय स्वर्गस्थ माता पित्यांचे संस्कार,आदरणीय दादांचा आशिष तसेच अर्धांगिनी सोनलताई ,लाडके सुपुत्र
 नमनकुमार यांची भक्कम जोड त्यांना सकारात्मक कार्यासाठी प्रेरणा देत आहे.महाराष्ट्र शासन सार्वजानिक आरोग्य विभाग निर्मित प्रथम जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीचेही त्यांनी अशासकीय सदस्य म्हणून काम पाहिले सोबतच कोरोनाच्या महागंभीर काळातही पवनभाऊ यांनी मोठ्या प्रमाणात जीवाची पर्वा न करता सेवा केली.पवनभाऊ जैन यांच्या मंगलमय जन्मदिनानिमित्त अनेक बहुविध सेवा उपक्रमांचे सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन व उपहार फाउंडेशन तर्फे विशेष आयोजन करण्यात आले असून परमेश्वर त्यांना जनसेवार्थ उदंड आणि निरामय आयुष्य प्रदान करो या मनापासून हार्दिक सदिच्छा.पवनभाऊ यांचा इवलेसे रोपटे असलेला स्नेही जनांचा परिवार आज मोठ्या कल्पवृक्षात बहरत आहे.

Post a Comment

0 Comments