आरोग्य उपकेंद्रा वर वीस वर्षा पासून अतिक्रमण
खेट्री प्रतिनिधि,,,
पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथे गेल्या वीस वर्षापासून आरोग्य उपकेंद्रावर अतिक्रमण असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. याकडे संबंधित आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णांना वेळेवर उपचार व्हावा या उद्देशाने शासनाने लाखो रुपये खर्च करून खेट्री येथे आरोग्य उप केंद्रा साठी नवीन इमारती ची उभारणी केली, मात्र नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटन गेल्या विस वर्षापासून रखडले आहे. 
आरोग्य उपकेंद्राच्या इमारती वर खाजगी अतिक्रमण असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन आरोग्य उपकेंद्रावर असलेला अतिक्रमण मोकळा करून रुग्णांसाठी आरोग्य सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीवर अतिक्रमण करणाऱ्यांना आरोग्य विभाग व ग्रामपंचायत इस्त्रावरून सूचना देण्यात आल्या अतिक्रमण मोकळे न केल्यास पोलिसात तक्रार देण्यात येईल
जहुर खान सरपंच खेट्री ना नोटिस द्वारे सांगितले
रुग्णांना सहन करावा लागतोय आर्थिक भुर्दंड
गेल्या वीस वर्षापासून आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीवर अतिक्रमण असल्याने रुग्णांना खाजगी डॉक्टरकडून उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
           बातमी वजहिरती साठी सम्पर्क करा,